Tuesday, November 10, 2026
Google search engine
Homeआष्टीआष्टी येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघे जागीच ठार एक गंभीर...
spot_img

आष्टी येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघे जागीच ठार एक गंभीर जखमी

आष्टी येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघे जागीच ठार एक गंभीर जखमी

 

आष्टी प्रतिनिधी

 

आष्टी येथे चामोर्शी रोड एचपी पेट्रोल पंप समोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोघेजण जागीच ठार एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

 

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील नागरिकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने लॉईड मेटलच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, मृत्यूमध्ये राजू येलमुले व आठ नंबर येतील श्याम विश्वास असे मृत व्यक्तीचे नाव आहे व संदीप राजू येलमुले यांची प्रकृती गंभीर असून त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे अपघाताच्या घटनेमुळे अनकोडा या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर बापलेक हे अनकोडा वरून आष्टी करिता येत होते व श्याम विश्वास हे आष्टी वरून आपल्या गावी जात होते.

ताज्या घडामोडी
आजच्या ताज्या बातम्या
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय बातम्या