Sunday, November 8, 2026
Google search engine
Homeआष्टीआष्टी अप्पर तालुक्याच्या मागणीसाठी महसूलमंत्री बावनकुळेंशी सकारात्मक चर्चा

आष्टी अप्पर तालुक्याच्या मागणीसाठी महसूलमंत्री बावनकुळेंशी सकारात्मक चर्चा

गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आष्टी तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष नागपूर येथे राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शासनाच्या २२ सप्टेंबर २०२६ च्या शासन आदेशातून प्रस्तावित अपर तालुक्याच्या यादीतून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने आष्टी व परिसरातील जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याच पार्श्वभूमीवर दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी आष्टी बंदही पुकारण्यात आला होता.

या भेटीप्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आष्टीला अपर तालुक्याचा दर्जा का मिळणे आवश्यक आहे, याची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली. आष्टी परिसराची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, शासकीय कार्यालयांसाठी जनतेला करावा लागणारा लांबचा प्रवास, तसेच चामोर्शी तालुक्यावर असलेला ताण या सर्व मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

मंत्री महोदयांसोबत आष्टी अप्पर तालुका घोषित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री महोदयांनी आष्टी तालुका होईल, याबाबत होकार दर्शविल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी तथा आजूबाजूच्या आष्टी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री महोदयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आष्टी तालुका निर्मितीचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

फोटो कॅप्शन – नागपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आष्टी अपर तालुक्याबाबत निवेदन देताना आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीचे पदाधिकारी.

ताज्या घडामोडी
आजच्या ताज्या बातम्या
- Advertisment -spot_img

लोकप्रिय बातम्या