ग्राहक सेवा समिती सदस्य पदी अनिल गुरनुले यांची निवड
बोरी/लगाम
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लगाम येथे ग्राहक सेवा समिती ची सभा नुकतीच पार पडली असून लगाम परिसरातील 27 गावातील नागरिकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सेवा पुरविण्यात येत.या प्रसंगी ग्राहक सेवा समिती सदश्य निवड नुकतीच पार पडली. बँकेची सेवा अधिक लोकाभिमुख आणि ग्राहक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली ग्राहकांना अत्याधुनिक आणि तत्पर सेवा देण्यात अडीअडचणीचे स्थानिक पातळीवर जलद निवारण करण्यासाठी बँकेच्या विविध योजना ठेवी आणि डिजिटल बँकिंग सेवा जनसामान्य पर्यंत पोहोचविण्यास मदत होईल ग्राहकाच्या हक्काचे संरक्षण आणि बँकेच्या सेवेचा दर्जा उंचावण्याचा उद्देश ठेवून ही बोरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव अनिल गुरनुले यांची ग्राहक सेवा समिती सदस्य म्हणुन सर्वानुमते यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा अधिकारी राजेश वासेकर लिपिक अमोल गराडे व राजू कुडमेथे प्रतिष्ठित नागरिक राजेश अवनुरवार, पवित्र समजदार शांतीग्राम संस्थेचे गटसचिव प्रदीप पांडे आणि बँकेतील ग्राहक यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित समितीला पुढील वाटचालीसाठी ग्राहकांनी शुभेच्छा दिल्या.




