आष्टी प्रतिनिधी
दिनांक ११/११/२०१५ रोजी मा न्यायालतील प्रलंबित खटल्यापैकी एकूण १०९ गुन्हयांचे मुद्देमाल नाश करण्याबाबत न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुद्देमाल नाश व पथकबाबत आदेश प्राप्त करून गणेश कुचेकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस स्टेशन आष्टी स्टाफ मिळून वनपरिक्षेत्र अधिकारी. चौडमपल्ली यांच्या मान्यतेने ने मौजा- मार्कंडा कंसोबा जंगल परिसरा च्या खुल्या जागेत खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने प्रोव्ही जप्त मुद्द्यमाल दोन पंचासमक्ष व राज्य उत्पादन शुल्क स्टाफ व पोलीस स्टाफ यांच्या समक्ष *109 गुन्ह्यातील रु 14,48,180/- किंमतीचा मुद्देमाल ( देशी/ विदेशी दारू) नाश करण्यात आला आहे. यावेळेस आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे, रवींद्र बोडे, प्रताप टोगरवार व कर्मचारी उपस्थित होते.



