“राष्ट्रीय मानवाधिकार संघठन” (असो ) नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेशचे वतीने धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम “बंदूर “व “गुरेकसा” येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी
संघटनेच्या वतीने दिवाळी निमित्त अतिदुर्गम गावातील विविध समस्यांची तात्काळ दखल घेऊन समस्या निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचा पुढाकार
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम,घनदाट जंगलांनी वेढलेला “बंदूर” आणि “गुरेकसा” , ता. धानोरा येथे आदिवासी बांधवांसोबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या उपस्थितीत स्थानिक अतिदुर्गम गावातील आदिवासी गावकरी बांधवा सोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांचे आनंद गगनात मावेनासे झाले. समस्त ग्रामस्थांना फराळ वाटप केले. आपुलकीने संवाद साधत, गावाच्या विकासावर आणि स्थानिक समस्यांवर चर्चा केली.
व गावातील नागरिकांच्या महत्त्वाच्या समस्या जाणून घेतले व त्या समस्येचा निराकरण करण्यासाठी थेट जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासोबत व संवर्ग विकास अधिकारी दुबे यांच्याशी थेट भ्रमणध्वनीवर चर्चा करून, संबंधित विषयावर तोडगा काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सल्लागार देवानंद भाऊ खुणे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विनोद किरमे,ज्येष्ठ नेते दीपक खुणे,पारस भाऊ खुणे, नितेश खुणे,शुभम दास,मंगेश मुराडे, अवी मंडल व स्थानिक बंदूर व गुरेकसा येथील लालसाय तुलावी,सुनील किरकेटा राजेश तुलावी, बारसाय गावडे,रवींद्र कराळे व रहिवाशी कुटुंबीयांचा प्रेमळ पाहुणचार आणि ग्रामस्थांची माया यामुळे ही दिवाळी अधिकच संस्मरणीय ठरली.यावेळी प्रत्येक घरात आनंद, प्रत्येक मनात विश्वास आणि प्रत्येक गावात विकासाचा प्रकाश नांदो अशी आशा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी व्यक्त केले.








