आदिवासी संस्थांचा धान खरेदीवर बहिष्कार कायम
—————————————–
आदिवासी विकास महामंडळाच्या वार्षिक साधारण सभेच्या बैठकीत दिलेले आश्वासन ठरले फोल .
—————————————–
बोरी/लगाम
दिनांक 5/11/2026 ला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा येथे पार पडली त्यावेळी कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व गडचिरोली तालुक्यातील सर्व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.त्यामध्ये पुढील हंगाम २०२६/२७ मध्ये धान खरेदी करण्याबाबत चर्चा झाली त्यामध्ये सर्व संस्थेच्या सभापती व पदाधिकारी व कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये, आदिवासी विकास महामंडळ नाशिक ची वार्षिक साधारण सभा चंद्रपूर येथे दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी होती. वार्षिक सभेत आश्वासन दिले की , आपल्याला हंगाम 2025/ 26 मधील 30 टक्के कमिशन देऊ व दोन्ही संस्थांना बांधील असा करारनामा करण्यात येईल, आपल्याला दिलेले घटी-तुटीचे आदेश रद्द करून सुधारित कारणे दाखवा नोटीस काढण्यात येईल असे सांगितले होते.परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता संस्थांना लालीपाप देण्यासाठी पुढील हंगाम 2026-27 मध्ये ज्या संस्था करारनामा करून देईल.त्या संस्थेला त्यांच्या उद्दिष्टानुसार 30% कमिशन देऊ असे पत्र काढलेले आहे.याबाबत विचारणा केली की , आपण वार्षिक साधारण सभेत दिलेल्या आश्वासन खोटे होते का असे अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यांनी आपण पुढील हंगामाचा करारनामा करावा नंतरच उद्धिष्टानुसार कमिशन दिले जाईल असे सांगितले. संस्थांच्या हक्काचा कमिशन देत नसतील तर आपल्याला दान खरेदीवर बहिष्कार चा निर्णय घ्यावा लागेल. संस्थेला वेटिश धरणाऱ्या आदिवासी विकास महामंडळापासून सतर्कता बाळगून ज्या अटी दिलेले आहेत त्यात विशेष करून करारनाम्यामध्ये धान उचल बाबत स्पष्ट निर्देश असावे.त्याचा साठवणूक कालावधी व घटितुटीचा नियम झाला पाहिजे. तसेच संस्थांना मागील हंगामातील कमिशन व मंडी लेबर चार्जेस जोपर्यंत संस्थेच्या मिळणार नाही तोपर्यंत कोणतीही संस्था खरेदी तयार होणार नाही. असे ठरविण्यात आले. यापुढे शिष्टमंडळ घेऊन आपण चर्चा न करता सर्वांना सोबत घेऊनच चर्चा करावी असे ठरले.
आदिवासी विकास महामंडळाचे नवनिर्वाचित संचालक यांना आपल्या अडचणी सांगण्यात आल्या संस्थांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमच्या संस्था खरेदी करणार नाही असे ठरवुन धान खरेदीवर बहिष्कार टाकलेला आहे.तरी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राची खरेदी प्रक्रिया थांबवून खरेदीवर बहिष्कार टाकावा असे संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष हेमंत शेंद्रे यांनी सांगितले. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोपाल जी उईके सर व यशवंत पाटील चौरीकर कुरखेडा संस्थेचे सभापती बाबुरावजी तुलावी. व्यंकटीजी नागिलवार, चांगदेव जी फाये देलवाडी चे अध्यक्ष ईश्वर मडावी, धर्मदास उईके आणि जिल्ह्यातील सर्व संस्थांचे सभापती पदाधिकारी व कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.




